Welcome to My New Blog...https://infoentrepreneurship.blogspot.com/.

इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि इतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत.___ विल्यम शेक्सपिअर

Tuesday, 25 July 2017

टपाल खात्यातर्फे पत्रलेखन स्पर्धा (All India Letter Writing Competition)..

टपाल खात्यातर्फे पत्रलेखन स्पर्धा...


All India Letter Writing Competition...by .IndiaPost


पुणे : पत्रलेखनाविषयी समाजात जनजागृती व्हावी, यासाठी टपाल खात्यातर्फे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वयोगटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

‘प्रिय बापू (महात्मा गांधी), तुम्ही आम्हाला प्रेरीत करता’ या विषयावर स्पर्धकांना पत्र लिहिता येणार आहे. आंतर्देशीय पत्रासाठी पाचशे शब्दांची मर्यादा देण्यात आली असून लिफाफा असल्यास एक हजार शब्दांचे पत्र लिहिता येणार आहेत. आंतर्देशीय पत्र किंवा लिफाफा या दोनच पत्रांचा वापर स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. १५ ऑगस्टपूर्वी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई, ४००००१ या पत्त्यावर पत्रे पाठवता येणार आहेत, अशी माहिती पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहायक पोस्टमास्तर जनरल एफ. बी. सय्यद या वेळी उपस्थित होते.

स्पर्धकांना पत्राच्या मागे संपूर्ण, नाव, पत्ता, वय, आणि पिनकोड लिहणे बंधनकारक आहे. या पत्रांसाठी पुणे प्रधान डाकघर, सिटी पोस्ट कार्यालय, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस, चिंचवड पोस्ट ऑफिस, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस येथे विशेष पत्रपेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक गटातून तीन विजेते निवडण्यात येणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने साबरमती आश्रम येथे होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्या पत्रलेखकांचा सन्मान केला जाईल.


बातमी साथी येथे क्लिक करा ______



अधिकृत माहिती येथे क्लिक करा _____



# Collection_Niraj Mahamure ..#

Labels

पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते._ ए. पी. जे. अब्दुल कलाम