शेतकरी तर काय करणार....
सत्य परिस्थिति मंडली आहे --नीरज महामुरे
सध्या शेतात महत्त्वाची पिके म्हणजे सोयाबीन, भुईमूग, तूर, मुग, उडीद तसेच काही भाजीपाला पण आहे.
खार तर सध्या पावसाची खूप प्रतीक्षा आहे सर्वानाच, पण पावसाची जास्त गरज आहे ती शेतातील या पिकांना.
मी शेतामध्ये त्या पिकांच्या जवळ गेलो आणि जवळ जावून त्यांना हात लावून बघू लागलो.सोयाबीन, भुईमूग, तूर, मुग, उडीद या पिकांची वाढ योग्य रितन झाली आतापर्यंत, पण इथून पुढे पिकांची वाटचाल अवघड होतं चालली आहे कारण जमिनीतील ओलावा संपत चालला आहे, त्यांना पाण्याची खरच गरज आहे.
जमिनीतील पाणी कमी होत चाल्यामुळे जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. कळया आईला सुध्या तहान लागू लागली आहे.पण तहान भागवण्यासाठी पुरेस पाणी देऊ शकत नाही शेतकरी.
शेतकरी तर काय करणार...!
शेवटी वरून राजाला एकच विनंती
"आमच्या कडून चुका झाल्या असतील ,आमच्या कडून पाप घडलं असेल , तर त्याची शिक्षा तू आमच्या शेतकऱ्यांना देऊ नको...तू तरी शेतकऱ्यांचा वाली हो...आणी सर्वांना आनंदात ठेव."
सर्वांना नर्म विनंती..
"झाडे लावू, झाडे जगवू, पाऊस पडू ,आनंदाने जीवन जगू"
सत्य परिस्थिति मंडली आहे --नीरज महामुरे