Welcome to My New Blog...https://infoentrepreneurship.blogspot.com/.

इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि इतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत.___ विल्यम शेक्सपिअर

Monday, 28 August 2017

मराठी ई-बुक प्रकल्प...महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

ई-बुक प्रकल्पाची संकल्पना...

Reference Source: https://msblc.maharashtra.gov.in/index.html

‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील सर्व माहिती...........

'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्राची भाषा,  संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.'

अधिक माहितीसाठी खाली दिलेलल्या लिंक वर क्लॉक करा ... 
होम पेज (Home Page)


Labels

पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते._ ए. पी. जे. अब्दुल कलाम